रेडमी नोट ८ आणि रेडमी नोट ८ प्रो च्या किंमती उघड, एवढ्या किंमतीत मिळणार..

रेडमी नोट आणि नोट ८ प्रो येत्या दोन तीन दिवसांत चीन मध्ये सादर होणार असून तो लवकरच भारतात सुद्धा सादर होणार आहे. परंतु याआधीच या दोन्ही स्मार्टफोन्सची माहिती समोर अली आहे. रेडमीचे व्यवस्थापक लू विबिंग यांनी अधिकृतरीत्या रेडमी नोट ८ प्रो ला सार्वजनिक केलं आहे. तसेच शाओमीचे अध्यक्ष लिन बिन यांनी दावा केला आहे कि रेडमी नोट ८ प्रो ची बॅटरी आरामात दोन दिवस जाईल. तसेच याव्यतिरिक्त शाओमीची ची कंपनी रेडमीने नोट प्रो चा कस्टम वारक्राफ्ट एडिशन आणणार असल्याची माहिती दिली आहे.

Redmi Note 8 pro 


काय असेल किंमत?

९१ मोबाईलकडून काही माहिती त्यांचा वेबसाईटवर देण्यात आली आहे. यामध्ये असं सांगण्यात आले आहे कि,
रेडमी नोट प्रो च्या ६जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज वेरिएंट ची किंमत १,७९९ चिनी युआन म्हणजे भारतीय रुपयांत जवळजवळ १८,००० रुपये एवढी असेल. ( ६जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेज साठी १४००० रुपये असेल.) तसेच ८जीबी आणि १२८जीबी स्टोरेज असणाऱ्या मोबाईलची किंमत २,०९९ चिनी युआन म्हणजे २१,००० रुपये एवढी असेल.
तसेच रेडमी नोट ८ ची किंमत ४जबी रॅम आणि ६४जीबी साठी १२,००० एवढी असू शकते. हि माहिती पूर्णतः इंटरनेट वर आलेल्या माहितीनुसार आहे. रेडमी नोट ८ आणि नोट ८ प्रो च्या किंमती शाओमी ने अजून अधिकृतरीत्या जाहीर केल्या नाही.

याव्यतिरिक्त शाओमी चे जनरल मॅनेजर लू विबिंग यांनी रेडमी नोट ८ प्रो च्या रिटेल बॉक्स ची प्रतिमा सार्वजनिक केली आहे. यात रेडमी नोट ८ प्रो गुलाबी रंगाच्या बॉक्स मध्ये दिसत आहे. अजून पुढे सांगतांना ते म्हंटले कि कंपनीने यावेळेस पॅकेजिंग मध्ये थोडे बदल केले आहे.

दुसरीकडे, शाओमी चे अध्यक्ष लिन बिन यांनी रेडमी नोट ८ प्रो बॅटरी दोन दिवस चालेल असा दावा केला असून, कंपनीने या आधीच उघड केले आहे कि रेडमी नोट प्रो मध्ये ४,५०० एमएएच एवढी बॅटरी असेल. आणि हो यामध्ये १८वॅट चा जलद चार्जे करणारा चार्जेर बॉक्स मध्येच मिळणार आहे,जो कि रेडमी नोट ७ प्रो मध्ये नव्हता.
रेडमी नोट ८ प्रो २९ ऑगस्ट ला चीनमध्ये सादर होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारा समर्थित.
google-site-verification: google69e0e83735aea948.html }); });