6000 एमएएच बॅटरी आणि 48 मेगापिक्सेल कॅमेरासोबत येत आहे सॅमसंगचा 'हा' मोबाईल

सॅमसंग त्यांच्या लोकप्रिय  Galaxy M सिरीज मध्ये अजून काही स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे.याच सिरीजमध्ये सॅमसंग Galaxy M30s लवकरच भारतीय बाजारात सादर करणार आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन लीक झाले आहे.सॅमसंग Galaxy M30s, 15 सप्टेंबरच्या आसपास भारतीय बाजारात उतरणार असल्याची चर्चा आहे. यात 6000 एमएएच  ची दमदार बॅटरी असणार आहे. सॅमसंगच्या आतापर्यंत कोणत्याच स्मार्टफोन मध्ये एवढी बॅटरी देण्यात आली नव्हती. त्यामुळे सॅमसंग Galaxy M30 सॅमसंगचा सगळ्यात जास्त बॅटरी असणारा फोन असेल.

सॅमसंग Galaxy M30sचे स्पेसिफिकेशन सुद्धा बाहेर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार सॅमसंग Galaxy M30च्या  डिस्प्लेमध्ये वाटरड्रॉप नॉच असेल. या फोनमध्ये 2400 x 1080 पिक्सेल रिजोल्यूशन ची 6.3 इंचची फुलएचडी+ डिस्प्ले असू शकते. सांगण्यात येतंय कि सॅमसंग Galaxy M30 अँड्रॉइड 9 पाई वर आधारित असेल.
यात प्रोसेसिंगसाठी सॅमसंगचाच एक्सनॉस 9610 चिपसेट देण्यात येणार आहे.

भारतात सॅमसंग Galaxy M30s चे दोन व्हेरियंट सादर करणार आहे. रिपोर्टनुसार सॅमसंग Galaxy M30sचा बेस व्हेरिएंट 4जीबी रॅम आणि 64जीबी असेल तर दुसरा व्हेरियंट 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल मेमोरीसोबत येईल. फोटोग्राफी साठी यात तीन कॅमेरे देण्यात येणार असून. यात 48 मेगापिक्सेलचा चा मुख्य कॅमेरा असेल जो एफ/2.0 अपर्चर सपोर्ट देईल. तसेच यात 8 मेगापिक्सेलचा वाईड अँगल कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सिंग कॅमेरा असेल. याव्यतिरिक्त या सेल्फी आणि विडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा यात बघायला मिळेल.

सॅमसंग Galaxy M30s च्या मागील बाजूस सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट देण्यात येणार आहे. यात इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर नसणार आहे. यात 6000एमएएचची बॅटरी 25 वॅट जलद चार्जिंगला सपोर्ट करते. सॅमसंग Galaxy M30s येत्या १५ सप्टेंबर च्या आसपास भारतात सादर होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारा समर्थित.
google-site-verification: google69e0e83735aea948.html }); });