रात्रभर मोबाईल चार्जिंग करता? हे वाचाच..

आपण दिवसभर कामानिमित्त बाहेरच असतो आणि त्यामुळे आपल्याला आपला स्मार्टफोन पूर्ण चार्जिंला झालेला असायला हवा असतो. म्हणूनच आपण मोबाइलला रात्रभर चार्जिंगला ठेवतो. पण तुम्हाला  माहित आहे का रात्रभर मोबाइलला चार्जिंगला ठेवल्यास काय होते? किंवा मोबाइलला रात्रभर चार्जिंगला ठेवणं सुरक्षित आहे का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटणार आहे.तर मोबाइलला रात्रभर चार्जिंगला ठेवल्यास कोणताही प्रकारचा स्फोट होत नाही. कारण मोबाईल फक्त कॉलिंग पुरता मर्यादित नसून तो एक स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन मध्ये AI असते ते स्मार्टसर्किट सुरु करतं  जे मोबाईलची बॅटरी १००% चार्ज झाल्यावर आपोआप विदुयत प्रवाह बंद करते त्यामुळे तुमचा मोबाईल ओव्हरचार्ज होत नाही.

रात्रभर मोबाईल चार्जिंग ला ठेवल्यास  कोणत्याही प्रकारची हानी होत नाही परंतु मोबाइलला रात्रभर चार्जिंगला ठेवणे हे अत्यंत चुकीचे आहे कारण मोबाइलला जास्तवेळ चार्जिंगला ठेवल्यास आपल्या स्मार्टफोन ची बॅटरी गरम होते. आणि त्यामुळे बॅटरीचा जीवनकाल कमी होतो. किंवा बॅटरी निकामी सुद्धा होऊ शकते. 

त्यामुळे गरज असेल तेव्हाच रात्रभर चार्जिंगला ठेवा. किंवा वेळ मिळत नसेल तर तुम्ही चार्जिंग अलार्म डाउनलोड करू शकता पण यात तुम्हाला मोबाईल १००% चार्ज झाल्यावर उठावे लागेल आणि मोबाईल चार्जिंगहुन काढावा लागेल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारा समर्थित.
google-site-verification: google69e0e83735aea948.html }); });