रिअलमी X2 प्रो भारतात लाँच, ६४ मेगापिक्सेल कॅमेरा, ५० वॅट सुपर चार्जेर, स्नॅपड्रॅगन ८५५+ प्रोसेसर...

रिअलमी ने आज (20/11/2019) बऱ्याच दिवसापासून चर्चेत असणारा रिअलमी  X2 प्रो भारतात लाँच केला आहे. त्यासोबतच त्यांनी रिअलमी 5s सुद्धा कमी बजेट असणाऱ्यांसाठी भारतीय बाजारपेठेत सादर केला.यावेळी  रिअलमी X2 प्रो शाओमीच्या रेडमी  प्रो ला चांगलीच टक्कर देईल असं मानलं जात आहे. ड्युअल नॅनो सिम सोबत येणारा रिअलमी X2 प्रो अँड्रॉइड 9 पाई वर आधारित असेल.

Realme X2 Pro India Unit

रिअलमी X2 प्रो स्पेसिफिकेशन 

१) कॅमेरा 📸

रिअलमीच्या  दमदार स्मार्टफोन मध्ये 4 कॅमेरे असून 64 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 13 मेगापिक्सेलचा टेलेफोटो कॅमेरा, 115 डिग्री अल्ट्रावाईड कॅमेरा तर 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा डेप्थ सेन्सिंगसाठी देण्यात आलेला आहे. तसेच सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे.

२) डिस्प्ले📱

रिअलमी X2 प्रो मध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी (2080x2400)सुपर एमोलेड फ्लुइड डिस्प्ले आहे. ज्याचा आस्पेक्ट रेशियो 20:9 असून रिफ्रेश रेट 135 हर्ट्झ आहे. हा डिस्प्ले पॅनल डीसी डीमींग 2.0 तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. यात वाईडवाईन L1 चा सुद्धा सपोर्ट देण्यात आलेला आहे.

३) बॅटरी 🔋

यात 4000mah ची दमदार बॅटरी देण्यात आलेली असून, बॉक्स मध्येच तुम्हाला 50 वॅट चा सुपर VOOC फास्ट चार्जर बघायला मिळेल. या सुपर चार्जरने रिअलमी X2 प्रो अवघ्या अर्ध्या तासात संपूर्ण चार्ज होईल. तसेच यात यूएस बी टाईप सी चार्जींग केबल देण्यात आलेली आहे. तसंच रिअलमी X2 प्रो च वजन 200 ग्राम च्या आसपास आहे.

४)प्रोसेसर 

रिअलमी X2 प्रो मध्ये क्वॉलकॉम च स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर देण्यात आलेलं असून 6 जीबी आणि 8 जीबी रॅम चे पर्याय खरेदीसाठी देण्यात आलेले आहे. तसेच यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असून ते खूपच फास्ट काम करतं. स्टोरेज टाईप यूएफएस 3.0 आहे.

५ अधिक स्पेसिफिकेशन 📱

रिअलमी X2 प्रो मध्ये गोरिला ग्लास5 दिलेला आहे. त्यामुळे मोबाईल पडला तरी त्यावर जास्त काही परिणाम दिसणार नाही. तसेच यात हेडफोन जॅक दिलेला आहे.

६) किंमत 💰

रिअलमी X2 प्रो: 8जीबी+ 128 जीबी= 29,999 रुपये 
                          12जीबी+ 256 जीबी= 34,999 रुपये 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारा समर्थित.
google-site-verification: google69e0e83735aea948.html }); });