विवोने चार कॅमेरे असणारा Vivo V17 केला भारतात सादर

आज (09/12/2019) विवो ने Vivo V17 प्रो चा छोटा भाऊ Vivo V17 भारतात लाँच केला आहे. भारतात लाँच करण्याअगोदर विवो ने हा फोन रशियात लाँच केल्या गेलेल्या मॉडेल पेक्षा थोडा वेगळा आहे. Vivo V17 मध्ये समोरच्या बाजूस पंच होल कॅमेरा असून मागच्या बाजूस चार कॅमेरा सेटअप आहे.


Vivo V17 ची किंमत आणि वैशिष्ट्ये 

Vivo V17 ची भारतात किंमत 22,990 रुपये एवढी असेल. हा स्मार्टफोन फक्त 8GB+128GB या व्हेरियंट मध्येच येतो. यामध्ये मिडनाईट ओसीएन(ब्लॅक) आणि ग्लेसियर आईस (व्हाईट) हे प्रकार बघायला मिळतील. विवो V17 मध्येची बॅटरी 4500mah असून ती तुम्हाला आरामशीर एक ते दीड दिवस जाईल. 

Vivo V17 मध्ये फुल्ल एचडी 6.44 इंचचा सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आलेला असून तो कमी ब्राईटनेस अँटी-फ्लिकर टेक्नॉलॉजि सोबत येतो ज्यामुळे अंधारात डोळ्यांना इजा पोहचत नाही. तसेच Vivo V17 प्रो मध्ये तुम्हाला qualcomm snapdragon 675 हे प्रोसेसर बघायला मिळेल जे रेडमी नोट 7 प्रो मध्ये सुद्धा आपण बघितलं. 

 विवो V17 मध्ये मागील बाजूस 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा व 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सिंगसाठी अशे चार कॅमेरे असून समोरच्या बाजूस  32मेगापिक्सेलचा सेल्फीसाठी उत्तम असा कॅमेरा देण्यात आलेला आहे.
सुरक्षेसाठी या स्मार्टफोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर्स देण्यात आलेलं असून फेसलॉक सुद्धा आहे. 

काही निवडक बँकेच्या कार्डवरून Vivo V17 खरेदी केल्यास 5% कॅशबॅक मिळेल तसेच याव्यतिरिक्त एयरटेल आणि वोडा-आयडिया कडून सुद्धा अतिरिक्त डेटा मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारा समर्थित.
google-site-verification: google69e0e83735aea948.html }); });