काय असतं WhatsApp End-To-End Encryption, जाणून घ्या..

फेसबुक ची मालकी असणारी व्हाट्सअँप नेहमी वेगवेगळी फीचर्स आणत असते. तर त्यातलाच एक फिचर आहे WhatsApp End-To-End Encryption. तर जाणून घेऊया काय आहे हे फिचर आणि त्याचे फायदे काय आहेत.
       


WhatsApp End-To-End Encryption हे एक सुरक्षा फिचर असून, यामुळे तुम्ही व्हाट्सअँप वर जो पण डाटा शेयर करता जसे कि तुमची चॅट, फोटो, विडिओ किंवा मॅप तर हा डाटा फक्त तुमच्यात आणि तुम्ही ज्याव्यक्तीसोबत हा डाटा शेयर करत आहात त्याच्यातच हा डाटा सुरक्षित राहील आणि हा डाटा फक्त तुम्ही आणि तीच व्यक्ती बघू शकेल. कसे? चला यास समजून घेऊया-

पहिले जेव्हा आपण व्हाट्सअँप वर संदेश पाठवायचो तेव्हा तो संदेश टेक्स्ट स्वरूपात जायचा, ज्या कारण कोणत्याही हॅकरला तो सहजरित्या वाचता यायचा. परंतु आता एंड-टू-एंड एनक्रिप्शन फिचर मुळे आपण जेव्हा पण WhatsApp वर मेसेज पाठवू तर तो एका कोड मध्ये रूपांतरित होऊन आपण ज्याला मेसेज पाठवत आहोत त्या व्यक्तीच्या फोन मध्ये तो डिकोड होईल. म्हणजे सोप्या शब्दात जर चावी तुमच्या कडे असेल तर कुलूप फक्त त्याच व्यक्तीकडे असेल. यामुळे तुमची चॅट आता खूपच सुरक्षित झालेली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारा समर्थित.
google-site-verification: google69e0e83735aea948.html }); });